News Flash

भारतात परतलेल्या ‘देसी गर्ल’च्या पदरात पडला आणखी एक चित्रपट!

प्रियांका लवकरच सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

priyanka
प्रियांका चोप्रा

‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातील प्रियांकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. परदेशात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणारी देसी गर्ल नुकतीच भारतात परतली असून तिच्या पदरामध्ये आणखी एक चित्रपट पडल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये वावरणा-या प्रियांकाचं मानधन सध्या प्रचंड वाढलं असून ती लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटासाठी प्रियांकाने तब्बल १४ कोटी रुपयांचे मानधन स्वीकारलं असून सर्वाधिक मानधन स्वीकारणा-या अभिनेत्रीच्या यादीमध्ये ती अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असूनही तिच्या वाट्याला आता आणखी एक चित्रपट आला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस.कॉम’च्या माहितीनुसार, ती लवकरच चित्रपट निर्मात्या सोनाली बोस यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे.

सोनाली बोस यांच्या आगामी चित्रपटामध्ये प्रियांका अभिनेता फरहान अख्तर याच्याबरोबर प्रमुख भूमिकेमध्ये झळकून येणार आहे. हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिने लिहीलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये प्रियांका, फरहान यांच्यासह जायरा वसीम झळकणार असून ऑगस्ट महिन्यामध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान, लहानपणापासूनच वकृत्वाचे कौशल्य मिळालेल्या आयशा चौधरीने तिच्या मृत्युपूर्वी ‘माय लिटिल एपिफेनिस’ हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षी जगाचा निरोप घेणा-या आयशाच्या याच पुस्तकावर आधारित चित्रपट सोनाली बोस लवकरच घेऊन येत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 12:00 pm

Web Title: priyanka chopra and farhan akhtar in shonali bose next film
Next Stories
1 ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : ‘हा’ अभिनेता साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका
2 …आणि हिना खान झाली पुन्हा एकदा ट्रोल!
3 मराठी चित्रपटांची हिंदी ‘धडक’ किती फायद्याची?
Just Now!
X