News Flash

प्रियांका चोप्राने भारतातील करोनाबाधितांसाठी खरेदी केले ५०० ऑक्सिजन कन्संट्रेटर्स आणि ४२२ सिलेंडर्स

इतक्या कोटींचा निधी जमा !!

बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंत आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतातील करोनाबाधितांना शक्य तितकी मदत करण्यात व्यस्त आहे. तसंच ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर करोना काळातील उपयुक्त माहिती शेअर करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करताना दिसून येतेय. इथवरच न थांबता प्रियांका चोप्राने भारतातील करोनाबाधितांसाठी आरोग्य सेवेतील वस्तू आणि सुविधा उपलब्ध करून ती भारतीयांची मदत करतेय.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा विदेशात असली तरी ती भारतीयांच्या कठीण काळात साथ देण्यासाठी ‘गिव्ह इंडिया’च्या माध्यमातून करोनाबाधितांची मदत करतेय. देश-विदेशातील मोठ मोठे उद्योगपती आणि इतर लोक अभिनेत्री प्रियांका चोप्राला करोना रिलीफ फंड जमा करण्यासाठी मदत करत आहे. यातूनच प्रियांका चोप्राने भारतातील करोनाबाधितांसाठी ५०० ऑक्सिजन कन्संट्रेटर्स आणि ४२२ सिलेंडर्स खरेदी केले आहेत. यासोबतच १० लसीकरण केंद्रावर प्रतिनिधींची देखील नियुक्ती केली आहे, जे भारतातील जवळजवळ ६००० पेक्षाही जास्त लोकांचे लसीकरण करतील.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. करोना काळात लोकांना मदत करण्यासाठी ती सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून तिने ही माहिती दिली. करोना रूग्णांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर तिला उत्तम प्रतिसाद देखील मिळतोय. यात प्रियांकाने जवळपास 3 मिलियन डॉलर म्हणजेच २२ कोटी रूपयांचा निधी जमा केला आहे.

Priyanka Chopra story 1 (PHOTO: Instagram@priyankachopra) Priyanka Chopra story 2 (PHOTO: Instagram@priyankachopra)

 

सोबतच स्टोरीच्या शेवटी करोनाबाधितांच्या रिलीफ फंडसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे तिने आभार देखील मानले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “ज्यांनी ज्यांनी या मोहिमेसाठी दान केलंय त्या सर्वांची मी आभारी, त्यांच्यामुळेच हे अशक्य काम शक्य झालंय…तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे…तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच करोना रूग्णांसाठीचा रिलीफ फंड 3 मिलियन डॉलर (22 कोटी रुपये) इतका जमा झाला आहे. ”

Priyanka Chopra story 4 (PHOTO: Instagram@priyankachopra)

सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्राची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. प्रियांका चोप्राच्या लाखो फॅन्सनी आणि नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टला लाइक आणि कमेंट्स करत तिचं भरभरून कौतूक देखील केलंय. कोरोना सारख्या महाभयंकर आजाराविरूद्धच्या लढ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. हॉलिवूडमध्येही छाप उमटविणारी प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत असली तरी ती कोविड-19च्या साथीत भारतासाठी मदत मिळवण्याबाबत तसंच आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 6:05 pm

Web Title: priyanka chopra is thankful donations for oxygen cylinders prp 93
Next Stories
1 पुन्हा त्याच जोशात येत आहे कारभारी लयभारी!
2 “खऱ्या इस्लाममध्ये स्त्रियाचं अस्तित्व पुरूषांच्या पायाजवळच”, म्हणणाऱ्या नेटकऱ्याला गौहरने दिले सडेतोड उत्तर
3 अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन
Just Now!
X