News Flash

प्रियांकाला भेटण्यासाठी निक जोनास सहकुटुंब येणार भारतात

प्रियांकाच्या कुटुंबीयांशी निकचं कुटुंब भेट घेणार आहे. निकचे कुटुंबीय खास लंडन आणि अमेरिकेवरून भारतात येणार आहेत.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, nick jonas , priyanka chopra

दोन महिन्यांपूर्वी भारतात आलेला प्रियांकाचा कथित प्रियकर निक जोनास याच आठवड्यात पुन्हा एकदा भारतात येणार आहे. मात्र यावेळी निक एकटा येत नसून तो सहकुटुंब भारतात येणार आहे. प्रियांका आणि निक जोनास हे दोघंही १८ ऑगस्टला आपल्या साखरपुड्याची औपचारिक घोषणा कुटुंबीयांसमोर करतील असं समजत आहे.

१८ ऑगस्टला निक जोनासचा वाढदिवस आहे. प्रियांकानं याच तारखेला मुंबईत एका शानदार पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीत प्रियांकाच्या कुटुंबीयांसह बॉलिवूडमधली अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. ही पार्टी प्रियांकानं खास निक आणि त्याच्या कुटुंबियांसाठी ठेवली आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे निकचे कुटुंबीय खास लंडन आणि अमेरिकेवरून भारतात येणार आहेत.

प्रियांकाच्या कुटुंबीयांशी निकचं कुटुंब भेट घेणार आहे. यापूर्वी प्रियांका आणि निक दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली होती. मात्र पहिल्यांदाच त्यांचं कुटुंबातील मंडळी या पार्टीनिमित्त एकमेकांशी भेटणार आहे. प्रियांका आणि निक या दोघांनी जुलै महिन्यात साखरपुडा केल्याची चर्चा होती मात्र या दोघांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 9:46 am

Web Title: priyanka chopra nick jonas will introduce families to each other at engagement bash in mumbai
Next Stories
1 Manikarnika first poster : खूब लडी मर्दानी झांसी की राणी!
2 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ची ‘चि. सौ. कां. रंगभूमी’वर मोहोर
3 अँटी- एजिंग क्रीम जाहिरातीवरून ट्रोल करणाऱ्यांना मीराचं उत्तर
Just Now!
X