News Flash

वाढत्या वयामुळे होणाऱ्या बदलांबद्दल प्रियांका म्हणते….

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने यावर वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. २००० मध्ये प्रियांकाने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला. तेव्हा पासून आता पर्यंत प्रियांकाच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्या बदलांचा प्रियांकावर काय परिणाम होतो याचा खुलासा प्रियांकाने एका मुलाखतीत केला आहे.

प्रियांकाने ‘याहू लाईफ’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या शरीरावर होणाऱ्या बदलांबद्दल सांगितले आहे. “बरं, मी खोटं बोलणार नाही की माझ्यावर त्याचा परिणाम होतं नाही. जसे माझे वय वाढतं आहे तसे बदल माझ्या शरीरात होतं आहेत, ज्या प्रमाणे प्रत्येकाच्या शरीरात बदल होतात, आणि या गोष्टीला मी मानसिकरीत्या स्वीकारले की ठीक आहे. आता मी अशीच दिसणार आहे, आता मी या शरीरासोबतच असणार आहे ना की १०-२० वर्षे जून्या शरीरासोबत, असे प्रियांका म्हणाली.

प्रियांका पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की हे महत्त्वाचं आहे आणि यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो की आपणं असे असलो तरी आपण काय काय करु शकतो. मी नेहमी विचार करते की मी काय करते? माझा हेतू काय आहे? मला देण्यात आलेलं काम मी व्यवस्थीत करत आहे का? सगळ्यां गोष्टींबद्दल मी चांगल्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करते. अगदी ज्या दिवशी मला माझ्या शरीराबद्दल चांगलं वाटतं नाही त्या दिवशी मला आवडत्या गोष्टी मी करते.”

आणखी वाचा : करण जोहरच्या प्रतिस्पर्धी निर्मात्यासोबत कार्तिक आर्यन करणार काम?

दरम्यान, प्रियांका आता अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सीरिजचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:23 pm

Web Title: priyanka chopra says her body has changed as she s gotten older and she has adapted to it dcp 98
Next Stories
1 ‘ज्याच्यासोबत घडते, तोच समजू शकतो’, ‘गोगी’ने वाहिली टप्पूच्या वडिलांना श्रद्धांजली
2 KKK11 : श्नेता तिवारीने फ्लॉंट केले एब्ज ; अर्जुन बिजलानी म्हणाला, कोणत्या च्यवनप्राशची जादू आहे ?
3 सुरेश रैना पाठोपाठ भज्जीच्या मदतीला धावून आला सोनू सूद, म्हणाला…
Just Now!
X