News Flash

‘मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता’- प्रियांका चोप्रा

एका मुलाखतीमध्ये तिने घराणेशाहीवर वक्तव्य केले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद उफाळून उठला. अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने देखील घराणेशाही या वादावर वक्तव्य केले होते. तिला एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे म्हटले होते.

प्रियांकाने मिड-डे मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे. सध्या घराणेशाही वाद सुरु असल्यामुळे तिची जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘चित्रपटसृष्टीचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्माला येणे यात काहीच गैर नाही. स्टार किड्सवर एक वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. माझ्या वेळी मला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते’ असे प्रियांकाने म्हटले.

‘मला एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. कारण निर्मात्यांना माझ्या भूमिकेसाठी दुसऱ्या व्यक्तीचे नाव सुचावण्यात आले होते. मला त्या वेळी वाईट वाटले होते पण त्यावर मी फार विचार न करता पुढे गेले. त्यानंतर मी स्वत:ला समजावले आणि कधीही अपयश आले तर घाबरायचे नाही असे ठरवले’ असे प्रियांकाने पुढे म्हटले होते.

सध्या प्रियांका बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही तिचा दबदबा पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान खान, जायरा वसीम आणि रोहित शराफ यांनी भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 5:44 pm

Web Title: priyanka chopra talks about the time when she was kicked out of a film avb 95
Next Stories
1 करोनाचा हाहाकार आता रुपेरी पडद्यावर; ऑस्कर विजेता लेखक करतोय चित्रपट
2 हरियाणा ते बिहार, १२०० किमी चा प्रवास सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीची कहाणी रुपेरी पडद्यावर
3 विभक्त झाल्यानंतर ब्रॅड पिट पहिल्यांदाच अँजेलिनाच्या घरी; दोन तास घालवले एकत्र
Just Now!
X