टेलिव्हिजन ‘क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली निर्माती एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स सिझन २’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सीरिजमधील अभिनेत्रीची फार चर्चा होत आहे. हॉरेक्स (हॉरर आणि सेक्स) प्रकारातील या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री आरती खेत्रपाल मुख्य भूमिका साकारत आहे. आरती सध्या सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.
गायक मिका सिंगच्या ‘समा है सुहाना सुहाना’ या म्युझिक व्हिडीओतून आरतीने तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने आतापर्यंत बरेच लाइव्ह शो केले असून ५०हून अधिक जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. इतकंच नव्हे तर आरतीची एक महिला फुटबॉल टीमसुद्धा आहे. ‘गर्ल्स विथ गोल्स’ असं या टीमचं नाव आहे. ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स सिझन २’मध्ये आरतीसोबतच दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांच्याही भूमिका आहेत.
२०११ मध्ये ‘रागिनी एमएमएस’ प्रदर्शित झाला होता. यामध्ये राजकुमार रावने मुख्य भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागात सनी लिओनी झळकली होती. तिसऱ्या भागात टीव्ही अभिनेत्री करिश्मा शर्माने भूमिका साकारली होती.