News Flash

राकेश बापटवर ‘ती’ कमेंट केल्याने रिद्धी डोगरा कश्मीरावर भडकली; सोशल मीडियावर दोघींमध्ये जुंपली

२०११ सालामध्ये राकेश आणि रिद्धी डोगरा विवाहबंधनात अडकले होते. तर २०१९ सालामध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

bb-ott-rakesh-bapat-kashmira-shah
(File Photo)

‘बिग बॉस ओटीटी’ या शोमुळे अभिनेता राकेश बापट चांगलाच चर्चेत आला आहे. राकेश बापट आणि त्याची पत्नी रिद्धी डोगरा यांचा घटस्फोट झाला असला तरी रिद्धी कायम राकेशला सपोर्ट करताना दिसते. तसचं राकेशच्या विरोधात बोलणाऱ्यांना देखील रिद्धी सडेतोड उत्तर देत आहे. नुकतच कश्मिरा शाहने राकेशला ‘जोरू का गुलाम’ म्हंटलं होतं. यावर रिद्धीने कश्मिराला चांगलंच सुनावलं आहे.

नुकतीच अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलिनाने ‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धकांची भेट घेतली. यावेळी शमिताने तिला राकेश बापट आवडतं असल्याचं पुन्हा एकदा कबुल केलं. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये राकेशने केवळ शमिताचं मन राखण्यासाठी प्रत्येक प्रश्नावर दिव्याचं तोंड पाण्यात बुडवलं. यावर राकेशने शमिताला घाबरुन असं केल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर कश्मीरा शाहने ट्वीटरवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणाली, “अभिनंदन राकेश पुन्हा एकदा तू जोरू का गुलाम बनण्याच्या मार्गावर आहेस”

हे देखील वाचा: प्रसिद्ध गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…

या पोस्टमध्ये रिद्धीचं नाव घेतलं नसलं तरी कश्मीराचा रोख रिद्धीवर असल्याचं लक्षात येतंय आणि म्हणूनच रिद्धीने कश्मीराच्या पोस्टला उत्तर दिलंय. एका ट्वीटमध्ये ती म्हणाली, “पुन्हा एकदा? एक्सक्यूज मी. कृपा करून अशी वाईट कमेंट करू नको. शांती राख”

तर रिद्धीच्या या कमेंटवर कश्मीराने पुन्हा एकदा पलटवार केला आहे. आणखी एक ट्वीट करत कश्मीरा म्हणाली, “बरं मग रिद्धी डोगरा, पहिल्यांदा जोरू का गुलाम होण्याच्या मार्गावर. शाती राख एक्स वाईफ”

२०११ सालामध्ये राकेश आणि रिद्धी डोगरा विवाहबंधनात अडकले होते. तर २०१९ सालामध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 6:37 pm

Web Title: ridhi dogara and kashmira shaha blasts on each other on social media for rakesh bapat kpw 89
Next Stories
1 तब्बल ११ वर्षांनंतर फरदीन खानचं पुनरागमन; या चित्रपटात करणार काम
2 काही वर्षांपूर्वी असे दिसायचे सिडनाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
3 प्रसिद्ध गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…
Just Now!
X