अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. सध्या रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून एका चाहत्याने तिला चक्क लग्नाची मागणी घातली आहे.
रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच केसात गजरा माळला आहे. साडीमधील अंदानी तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. तिला पाहून एका चाहत्याने चक्क लग्नाची मागणी घातली आहे. त्याने ‘माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.. माझ्याशी लग्न करशील का?’ असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी रिंकूची ‘हंड्रेड’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजमधील अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली होती. यामध्ये तिने ‘नेत्रा पाटील’ ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये तिने अभिनेत्री लारा दत्तासोबत स्क्रीन शेअर केली आहे.