News Flash

‘या’ महिला स्टार टेनिसपटूच्या आयुष्यावर रोहित शेट्टी साकारणार बायोपिक?

त्यानं नुकतीच इच्छा व्यक्त केली आहे

रोहित शेट्टी

खेळांडूंच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक आलेत, आता आणखी एका खेळाडूंच्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती करण्याचा मानस दिग्दर्शक रोहित शेट्टीनं बोलून दाखवला आहे. रोहितनं आतापर्यंत ‘गोलमाल’, (सिरिज) ‘सिंघम’, सिंघम रिटर्न’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ अशा अनेक ब्लॉकब्लस्टर चित्रपटांची निर्मिती केली, आता आपल्याला बायोपिक करायचा असल्याची इच्छा त्यानं बोलून दाखवली आहे.

रोहित शेट्टीला सानिया मिर्झाच्या आयुष्यावर चित्रपट तयार करायचा आहे. सानियाच्या आयुष्यावर खरं तर चित्रपट तयार करायला हवं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिब याच्याशी लग्न केल्यानंतर ती पाकिस्तानची सून झाली, तरीही भारताकडून खेळण्याचा तिचा निर्णय मला खूपच आवडला, तिचा तो धाडसी निणर्य पाहून मला अभिमान वाटला म्हणूनच तिच्या आयुष्यावर चित्रपट व्हायलाच हवा असं रोहित शेट्टी म्हणाला. काहीदिवसांपूर्वी सानियाला ‘बायोपिकमध्ये तूझी भूमिका कोणी करावी असं वाटतं? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपट आलाच तर परिणीती चोप्रानं माझी भूमिका साकारावी असं सानिया म्हणाली होती.

वाचा : ‘मला विरोध करणारी शिवसेना नव्हती’

सध्या रोहित ‘सिम्बा’ चित्रपटावर काम करत आहे. रणवीर सिंग या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहर यानंदेखील सानियाच्या आयुष्यावर चित्रपट तयार करायचं असल्याचं बोलून दाखवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 2:43 pm

Web Title: rohit shetty expressed his interest in biopic on sania mirza
Next Stories
1 अभिनेत्रीच्या फोटोवर आरटीओ अधिकाऱ्याची अश्लील कमेंट
2 सुप्रीम कोर्टाने दुखावल्या कोट्यवधी हिंदूंच्या भावना- सूरज पाल अमू
3 ‘पद्मावत’वर बंदी असूनही मोदी- नेतान्याहूच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये घुमर डान्स
Just Now!
X