News Flash

सारासोबत चित्रपटात दिसणार नाही, सैफनं केलं स्पष्ट

सैफ 'लव्ह आज कल'च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे

सारासोबत चित्रपटात दिसणार नाही, सैफनं केलं स्पष्ट

सारा अली खान इम्तिआज अलीच्या आगामी ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात साराचे वडील सैफ अली खाननं काम केलं होतं. सैफच्या सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट ठरला होता. या चित्रपटात आता आपली मुलगी सारा झळकणार हे ऐकून सैफही खूश आहे. या चित्रपटात सैफही महत्त्वाच्या भूमिकेत असेल अशाही चर्चा होत्या. मात्र सैफनं सारासोबत सीक्वलमध्ये काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

”सारा इम्तिआज अलीसोबत काम करणार आहे हे ऐकून मला खूपच आनंद झाला. इम्तिआज एक चांगला दिग्दर्शक आहे. त्यानं मला लव्ह आज कलच्या सीक्वलमध्ये एक भूमिका ऑफर केली होती. मात्र मी त्या चित्रपटात काम करणार नाही. सीक्वल खूपच चांगला असणार यात शंकाच नाही’ असं सैफनं स्पष्ट आहे. त्यामुळे सारा आणि सैफला एकत्र पाहण्याचं चाहत्यांचं स्वप्न तुर्त तरी भंगलं आहे.

दिल्लीमध्ये ‘लव्ह आज कल’च्या सीक्वलच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कार्तिक आर्यन आणि सारा अली खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर २००९ साली आलेल्या ‘लव्ह आज कल’मध्ये सैफसोबत दीपिका पादुकोन मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2019 5:08 pm

Web Title: saif ali khan not part of imitiaz alis love aaj kal sequel
Next Stories
1 कपड्यांवरून मुलीला ट्रोल करणाऱ्यांना अजयचं सडेतोड उत्तर
2 तब्बल २३ वर्षानंतर एकत्र झळकणार शिवाजी साटम-अलका कुबल यांची जोडी
3 #KabirSinghTeaser: बंडखोर ‘कबीर सिंग’चा दमदार टीझर
Just Now!
X