30 September 2020

News Flash

“नाईट क्लबमध्ये माझ्यावर झाला होता हल्ला”; सैफने सांगितला धक्कादायक अनुभव

एका व्यक्तीने दारूचा ग्लास सैफच्या डोक्यावर फेकून मारलं.

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानने ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला. एका नाईट क्लबमध्ये त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचं सैफने सांगितलं. दिल्लीतल्या एका पार्टीमध्ये ही घटना घडली होती.

याविषयी कार्यक्रमाची सूत्रसंचालक नेहा धुपियाशी बोलताना सैफने सांगितलं, “त्या नाईट क्लबमध्ये एक अज्ञात व्यक्ती माझ्याजवळ बोलायला आला. माझ्या गर्लफ्रेंसोबत डान्स कर अशी विनंती तो मला करू लागला. पण मला डान्स करायचा नव्हता. त्यामुळे मी साफ नकार दिला. त्यानंतर तो व्यक्ती खूप विचित्रपणे माझ्याशी वागू लागला. थोड्या वेळाने त्याने शिव्या देण्यास सुरुवात केली आणि अचानक त्याने त्याच्या हातातील व्हिस्कीचा ग्लास माझ्या डोक्यावर फेकला. तो मार इतका जबर होता की माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. माझा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता. पाण्याने तोंड धुण्यासाठी मी बाथरुमला गेलो असता तो व्यक्ती तिथेसुद्धा आला. त्याने पुन्हा साबणाची बशी घेतली आणि माझ्या दिशेने फेकली. तो व्यक्ती इतका वेडा होता की कदाचित त्या रात्री त्याने माझा जीवच घेतला असता.”

सैफ अली खान सहसा कोणत्या पार्टीमध्ये दिसत नाही. बॉलिवूड पार्ट्यांपासून तो दूरच राहणं पसंत करतो. मात्र दिल्लीतल्या या पार्टीचा अनुभव कधीच विसरणार नसल्याचं तो सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 8:57 am

Web Title: saif ali khan opens up about being attacked twice at a nightclub in delhi ssv 92
Next Stories
1 “सुशांत आणि सारा तीन दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्येच होते”
2 सुशांत प्रकरण : संदीप सिंहचा भाजपाशी संबंध?, फडणवीसांचा फोटो शेअर करत काँग्रेसकडून चौकशीची मागणी
3 आशा करते की, तुम्ही माझ्या वर्गात असाल; सनी लिओनीनं ‘त्या’ मेरिट लिस्टवर दिलं भन्नाट उत्तर
Just Now!
X