03 December 2020

News Flash

गर्लफ्रेंड लुलियामुळे सलमान पुन्हा एकदा ट्रोल

काहींनी तर लुलियाची तुलना ढिंच्यॅक पूजासोबत केली

सलमान खान, लूलिया वंतूर

बॉलिवूडमधला सुपरस्टार सलमान खान जे काही करतो त्याची चर्चा होतेच. सलमान त्याच्या सिनेमांचे प्रमोशन जसे सोशल मीडियावरुन करतो तसेच त्याच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींच्या कामाची माहितीही सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमान नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. त्याने आपली कथित प्रेयसी लुलिया वंतूरच्या गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केला. सलमानने त्याच्या ट्विटमध्ये लुलियाला तिच्या गाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यातला चांगुलपणा मात्र त्याच्याच अंगाशी आल्याचे दिसते. कारण ट्विटरकरांनी त्याच्या या ट्विटलाच ट्रोल केले. या गाण्यात लुलिया आणि मनिश पॉल एकत्र दिसणार आहेत.

ट्विटरकरांनी लुलियाला तू गाणं सोडून दे असा सल्ला दिला. तसेच आता तरी दुसऱ्यांची करिअर बनवणं आता तरी सोडून दे असा सल्लाही चाहत्यांनी सलमानला दिला. काहींनी तर लुलियाची तुलना ढिंच्यॅक पूजासोबत केली. या सर्व ट्रोलना सलमानने काहीही उत्तर दिले नाही.

दरम्यान, सध्या सलमान एका वेगळ्याच अडचणीत अडकला आहे. वाल्मिकी समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीला राजस्थान पोलिसांनी समन्स बजावले आहेत. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक हुकुम सिंह यांनी हे समन्स बजावले आहेत. सलमान आणि शिल्पासोबत चित्रपट विश्लेषक कोमल नाहटा यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.

सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका टीव्ही कार्यक्रमात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सलमान आणि शिल्पावर करण्यात आला आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात मुंबईतही दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. सलमानविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवरुन आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून उत्तर मागितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 6:59 pm

Web Title: salman khan get trolled for sharing girlfriend iulia vantur new song harjai first look
Next Stories
1 हृतिकबरोबरच्या अफेअरबद्दल कंगना म्हणते, ‘ना वो रोशनी थी ना अंधेरे..’
2 २ रुपयांत सलमान खानसोबत अक्षय कुमारने बनवले सॅनिटरी नॅपकीन
3 आम्ही लग्नाचा विचार केलाय, पण…
Just Now!
X