News Flash

आणखी एका अभिनेत्रीसाठी सलमान ठरला ‘गॉडफादर’

तिने टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे

बॉलिवूडचा दबंग खान सलमान आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी गॉडफादर ठरला आहे. त्याने नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये नव्या कलाकारांना प्राधान्य दिले आहे. त्याने काम दिलेले बरेच कलाकार आज चित्रपटसृष्टीत नावारुपास आले आहेत. या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. ते म्हणजे मॉडेल लेरीसा बॉंजीचे.

लेरीसा बाँजी ही एक ब्राझीलियन मॉडेल आहे. तसेच एक चांगली डान्सरदेखील आहे. लेरीसा अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत “सुभा होने ना दे” या गाण्यामध्ये हॉट लूकमध्ये दिसली होती. त्याचबरोबर तिने टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. “गो गोआ गॉन” या चित्रपटात लेरीसा सहाय्यक कलाकार म्हणून दिसली होती. पण सलमान सोबतच्या या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. लेरीसाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी टॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. ती ‘नेक्स्ट एन्टी’ आणि ‘ठीक्क’ या चित्रपटांमध्ये झळकली होती.

लेऱीसा लवकरच पंजाबी सुपरस्टार ‘गुरु रंधावा’ आणि देसी NRIच्या “सुरमा सुरमा” या म्युझिक अल्बममध्ये आपली अदाकारी दाखवणार आहे. लेरीसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान सोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच सलमानसोबत काम केल्याने आनंद होत असल्याचे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 6:50 pm

Web Title: salman khan is going to launch new model avb 95
Next Stories
1 हार्दिक पांड्याला का चिडवतात अय्यर अँड बबीता
2 “माझ्या बॉयफ्रेंडचे एकाच वेळी होते अनेक मुलींशी संबंध”
3 अमिताभ बच्चन ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात कसे पडले?
Just Now!
X