News Flash

Behind the Scenes : पाहा, ‘बिग बॉस 14’ च्या सेटवरील खास व्हिडीओ

पाहा, 'बिग बॉस १४' च्या सेटवरचा बिहाइंड द सीन

Behind the Scenes : पाहा, ‘बिग बॉस 14’ च्या सेटवरील खास व्हिडीओ

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चिला जाणारा बिग बॉस या शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक पर्वाप्रमाणेच या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरादेखील अभिनेता सलमान खानच्या हाती असणार आहे. त्यामुळे या शोविषयी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या पर्वामध्ये अनेक बदल करण्यात आले असून या शोच्या सेटवरील बिहाइंड द सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बिग बॉस १४ च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या बिहाइंड द सीनमध्ये अभिनेता सलमान खान त्याच्या खास अंदाजात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तसंच सेटवरील कामाची लगबगदेखील दिसून येत आहे.

दरम्यान, बिग बॉस १४ मध्ये नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच ‘बिग बॉस १४’ हा शो ३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 1:48 pm

Web Title: salman khans bts video from the sets of bigg boss 14 ssj 93
Next Stories
1 सोनू सूदकडून पॉपकॉर्न विकणाऱ्या मुलाला ऑनलाईन शिक्षणासाठी मदत
2 तारक मेहतामधील सोनू व्हायरल मिम्समुळे संतापली; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
3 कुब्रा सैतने ट्विटर केलं अनइन्स्टॉल; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Just Now!
X