News Flash

फोटो काढायला आलेल्या चाहत्यावर संतापली सारा, जाणून घ्या कारण

पाहा व्हिडीओ

अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक आहे. साराचे लाखो चाहते आहेत. मालदीववरून मुंबईत परतल्यानंतर साराचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी सारा एका चाहत्यावर संतापली होती.

साराचा हा व्हिडीओ ‘जासूस हीयर’ या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंग दिसतं आहेत. व्हिडीओत साराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओत एक मुलगा साराला पाहताच तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. तेव्हाच तो मास्क खाली घेतो आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी सारा त्याला थांबवते आणि बोलते की “तू काय करतोयस? तुम्ही असं करु शकतं नाही’. त्यानंतर सारा फोटोग्राफर्सला करोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी सांगते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasus Here (@jasus007)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasus Here (@jasus007)

दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सारासोबत मुख्य भूमिकेत वरुण धवन होता. तर, सारा लवकरच ‘अतरंगी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि धनुष सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:50 pm

Web Title: sara ali khan bashes a fan who pulled down his mask for selfie dcp 98
Next Stories
1 दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच निधन
2 ‘मारी’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन
3 ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना ICUमध्ये हलवले
Just Now!
X