28 September 2020

News Flash

चक्क मध्यरात्री ३ वाजता साराने केलं ‘हे’ गुगल सर्च

साराचं हे उत्तर साऱ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं

सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खानला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन काही काळच झाला आहे. मात्र उत्तम अभिनयशैली आणि संभाषण कौशल्य यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सारा सतत चर्चेचा विषय ठरत असते. काही दिवसांपूर्वीच साराने वोग मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. यावेळी झालेल्या एका मुलाखतीमध्ये साराने मनमोकळेपणाने चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे साराने गुगलवर  एकदा मध्यरात्री कोणत्या गोष्टीचा शोध घेतला होता हेदेखील सांगितलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, फोटोशूट केल्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये साराला तिच्या जीवनाशीसंबंधित काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची साराने दिलखुलासपणे उत्तर दिली. या प्रश्नांमध्ये साराला गुगलसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. मुलाखतकाराने साराला “गुगलवर शेवटचे काय सर्च केले होतं?” असा प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे या प्रश्नावर साराने दिलेलं उत्तर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. साराने शेवटचं गुगल सर्च मध्यरात्री तीन वाजता केलं होतं, असं तिने सांगितलं.

“मी मध्यरात्री ३ वाजता मुंबईतील मनोरी हे ठिकाण सर्च केलं होतं. हे ठिकाण मुंबईपासून दीड किलोमीटर लांब अंतरावर आहे. मात्र या ठिकाणापर्यंत पोहोचणारा रस्ता प्रचंड घाबरवणारा आहे”, असं सारा यावेळी म्हणाली.  साराचं उत्तर ऐकण्यासाठी सारे जण आतुर झाले होते. मात्र तिचं उत्तर ऐकल्यानंतर उपस्थित साऱ्यांच्या हास्याचा बांध फुटला.

दरम्यान, सारा सध्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सारा लवकरच इम्तियाज अलीच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 3:12 pm

Web Title: sara ali khan told that what she searched on google at night
Next Stories
1 दहा वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून गायब झालेली ही अभिनेत्री आता ‘गुगल’मध्ये मोठ्या पदावर
2 रणवीर सिंग साकारणार फिल्ड मार्शल सॅम माणेकशा?
3 तुमचे मनापासून आभार, इरफानची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट
Just Now!
X