News Flash

‘जागतिक संगीत दिना’च्या निमित्ताने सावनी रविंद्रचं मल्याळम गाणं रिलीज

सावनीने मराठीसह, हिंदी, तामिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत.

सावनीने मराठीसह, हिंदी, तामिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत.

संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी म्हणून गायिका सावनी रविंद्र ओळखली जाते. सावनी रविंद्रने जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत ‘वन्निदुमो अझगे’ हे मल्याळम रोमॅंटिक गाणं रिलीज केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या सिरीजमधील हे तिचं पहिलंच गाणं आहे. या गाण्यात सावनीसोबत गायक अभय जोधपुरकर आहे. हे गाणं लक्ष्मी हीने लिहीलं आहे. तर शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. प्रेमाची नवी परिभाषा सांगणाऱ्या या गाण्याचं चित्रीकरण चेन्नईत झालं आहे.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

सावनी मल्याळम गाण्याविषयी म्हणाली, “संगीताला भाषेचं बंधन नसतं. संगीत हीच एक भाषा आहे असं मी मानते आणि मी आजवर बहुभाषिक गाणी गायली. दाक्षिणात्य भाषेतील तामिळ, तेलुगू गाणी मी याआधी गायली आहेत. तर यापूर्वी मी मल्याळम भाषेत जिंगल्स गायल्या होत्या. मल्याळम भाषा तशी कठीण आहे. त्यामुळे मी सतत मल्याळम गाणी ऐकायचे. माझा गायक मित्र अभय जोधपुरकर आणि शुभंकर आम्ही तिघांनी हे गाणं करायचं ठरवलं. आम्ही तिघं ही महाराष्ट्रातले आहोत. अभयने याआधी मल्याळममध्ये बरचं काम केलं आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आमच्या गाठीशी होता.”

आणखी वाचा : ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

पुढे ती म्हणाली, “गाण्याचे चित्रीकरण चेन्नईत करण्यात आले. त्यावेळेस मी चार महिन्याची प्रेग्नेंट होते. त्यामुळे त्या परिस्थितीत मी मुंबईहून चेन्नईला गेले. आणि ते गाणं चित्रीत केलं. हे सर्व माझ्यासाठी खूप चॅलेंजींग होतं. आणि अर्थातच खूप आनंदाने मी हे चॅलेंज स्वीकारलं. तसेच माझे पती या गाण्याचे निर्माते डॉ. आशिष धांडे या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत होते. सध्या आम्ही आयुष्यातील एका सुंदर टप्प्यावर आहोत. त्यामुळे हे गाणं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे.”

आणखी वाचा : ‘तू तिसरं लग्न करणार आहेस?’ श्वेता तिवारी झाली ट्रोल

दरम्यान, आजवर सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिच्या या रोमॅन्टिक मल्याळम गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:25 pm

Web Title: savaniee ravindrra news song before international music day 2021 dcp 98
Next Stories
1 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टप्पू आज आहे बेरोजगार
2 ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य
3 Happy Father’s Day 2021: बॉलिवूडकर असा साजरा करत आहेत फादर्स डे; सोशल मीडियावर शेअर केले फोटोज
Just Now!
X