News Flash

सलमानबद्दलच्या प्रश्नांनी कंटाळलोय- शाहरुख

शाहरुख-सलमान यांची मैत्री आणि शत्रुत्व हे नेहमीच बॉलीवूडचा चर्चेचा विषय राहिले आहेत. काही वर्षांपूर्वी कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत या दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले होते.

| August 2, 2014 04:18 am

शाहरुख-सलमान यांची मैत्री आणि शत्रुत्व हे नेहमीच बॉलीवूडचा चर्चेचा विषय राहिले आहेत. काही वर्षांपूर्वी कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत या दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले होते. त्यानंतर गेल्याचवर्षी हे बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत एकत्र आले आणि त्यांनी गळाभेट केली. हेच दृश्य या वर्षीच्या इफ्तार पार्टीतही पाहायला मिळाले. त्यामुळे या दोघांमधील शत्रुत्व संपून आता पुन्हा मैत्री झाल्याचे चित्र निर्माण झाले. पण सलमानविषयी शाहरुखला प्रश्न विचारल्यावर तो आता याला कंटाळला आहे, असे म्हणाला. त्यामुळे हे मैत्रीचे चित्र पुन्हा धुरकट तर होत नाही ना असं प्रश्न पडू लागला आहे.
शाहरुख खान नुकताच एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. त्यावेळी माध्यमांनी त्याला विचारले की, सलमान एक चांगला चित्रकार आहे, त्याने तुला कधी चित्र भेटस्वरुपात दिलेले का? त्यावर शाहरुख म्हणाला की, हा खूप जुना प्रश्न आहे आणि आता आम्ही एकमेकांशी गळाभेटही केली आहे. आम्ही दोघ मित्र आहोत. गेली कित्येक वर्ष तुम्ही मला एकचं प्रश्न विचारत आहात… कंटाळलोय मी आता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 4:18 am

Web Title: shah rukh khan i am bored of questions about salman khan
टॅग : Pk
Next Stories
1 कतरिना कैफला आता अभिनयाचीही संधी!
2 घुमान साहित्य संमेलन बोधचिन्हात अभंगाचे सुलेखन
3 ‘एसीपी प्रद्युम्न’ यांच्या भेटीसाठी इंदूरहून मुलाचे पलायन!
Just Now!
X