News Flash

टि्वटरवरील चाहात्यांसाठी शाहरूखचा ‘ऑडिओ मेसेज’

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने टि्वटरवर एक कोटी चाहात्यांचा आकडा पार केला असून, टि्वटरवरील आपल्या या चाहात्यांचे आभार मानण्यासाठी शाहरुखने पहिल्यांदाच 'ऑडिओ टि्वट'चा वापर केला.

| November 24, 2014 03:19 am

टि्वटरवरील चाहात्यांसाठी शाहरूखचा ‘ऑडिओ मेसेज’

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने टि्वटरवर एक कोटी चाहात्यांचा आकडा पार केला असून, टि्वटरवरील आपल्या या चाहात्यांचे आभार मानण्यासाठी शाहरूखने पहिल्यांदाच ‘ऑडिओ टि्वट’चा वापर केला. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास ‘व्हॉईस ब्लॉगिंग’ सुरू करण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. टि्वटरवरील आपल्या ‘व्हईस मेसेज’मध्ये शाहरूख म्हणतो, असे पहिल्यांदाच होत आहे की तुम्ही मला टि्वटरवर ऐकत आहात. टि्वटरवर एक कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्सचा आकडा पार करत, माझ्यावर तुम्ही केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. माझसुध्दा तुमच्यावर खूप प्रेम आहे. टि्वटरवर एक कोटी सोळा लाखपेक्षा जास्त चाहाते असलेले बॉलिवूडचे माहानायक अमिताभ बच्चन टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येत शाहरूखच्या पुढे आहेत. शाहरूखने पहिल्यांदाच टि्वटरवरून चाहात्यांसाठी ‘व्हॉईस मेसेज’ पोस्ट केला असून, या उपक्रमास चाहात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास ‘व्हईस ब्लॉगिंग’ सुरू करण्याचा त्याचा मनोदय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2014 3:19 am

Web Title: shah rukh khan posts audio message for 10 million twitter followers
Next Stories
1 शिल्पा आणि अर्नोल्डची भेट
2 छायाचित्रकारांकडून सलमानवरील बंदी मागे
3 दिग्दर्शक प्रकाश झा यांचे ट्विटवर पदार्पण
Just Now!
X