06 July 2020

News Flash

पुन्हा ‘कमीने’ !

बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर याला पुन्हा एकदा ‘कमीने’ होण्याची इच्छा आहे. रुपेरी पडद्यावर ‘चॉकलेट बॉय’ची इमेज असणाऱ्या शाहीदला ‘कमीने-२’मध्ये काम करण्याची इच्छा आहे.

| September 28, 2014 05:18 am

बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर याला पुन्हा एकदा ‘कमीने’ होण्याची इच्छा आहे. रुपेरी पडद्यावर ‘चॉकलेट बॉय’ची इमेज असणाऱ्या शाहीदला ‘कमीने-२’मध्ये काम करण्याची इच्छा आहे. विशाल भारद्वाजचा ‘कमीने’हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात शाहीद कपूरची दुहेरी भूमिका होती. विशाल भारद्वाज ‘कमीने’चा सिक्वल तयार करत असल्याची चर्चा आहे.
‘कमीने’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करायला मिळाले तर खूप आवडेल, अशी प्रतिक्रिया शाहीदने व्यक्त केली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात शाहीद कपूरची मुख्य भूमिका आहे.  
‘कमीने’ आणि ‘हैदर’ या दोन्ही चित्रपटांत विशाल भारद्वाजबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. एवढेच नाही तर विशालच्या चित्रपटांनी आपल्याला चांगले यश मिळवून दिले असल्याने ते आपल्यासाठी ‘लकी’ आहेत असे शाहीद मानतो. म्हणूनच ‘हैदर’नंतर विशाल भारद्वाज त्यांच्या पुढील चित्रपटातही आपल्याला घेतील आणि तो चित्रपट ‘कमीने-२’ असेल, असा विश्वास शाहीदला वाटतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2014 5:18 am

Web Title: shahid kapoor confirms sequel to kaminey
Next Stories
1 भावनिक, देखणे ‘टपाल’
2 ‘कधी घरी, कधी शेजारी’जुन्या बाटलीत जुनीच दारू!
3 सचिनसह भाऊ कदम आणि वैभव मांगले म्हणताहेत ‘सांगतो ऐका’!
Just Now!
X