News Flash

शाहरुखचे मुलांना ज्ञान, महिलांचा सन्मान नाही केला तर…

अजूनही वेळ गेलेली नाही

शाहरुख, आर्यन आणि अब्राम खान

अभिनेता शाहरुख खान हा एक उत्तम अभिनेता आहे याबद्दल काही वाद नाही पण तो एक चांगला बाबाही हे तो वेळोवेळी दाखवून देत असतो. तो आपल्या मुलांना नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचे सल्ले देत असतो. नुकताच शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले की तो आपल्या मुलांना म्हणजे आर्यन आणि अब्रामला नेहमीच महिलांना मान देण्याची शिकवण देत असतो. कुठल्याही मुलीला दुखावू नका आणि जर तुम्ही असं कधी केलं तर तुम्हाला सगळ्यात कठीण शिक्षा केली जाईल. मी त्यांना हेही सांगितले की, अजूनही वेळ गेलेली नाही. एक मुलगी कधीही तुमची ‘चड्डी- बड्डी’ होऊ शकत नाही. तुम्ही नेहमीच तिचा मान ठेवला पाहिजे.

शाहरुखने याआधीही, त्याच्या मुलीला म्हणजे सुहानाला डेट करु इच्छिणाऱ्या मुलांसाठी काही नियम बनवले होते. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, सुहानाच्या आयुष्यात असा कोणी खास मुलगा यावा असं मला वाटतं . पण जो कोणी सुहानाला डेट करेल त्याला शाहरुखने बनवलेल्या नियमांचे पालन करावेच लागेल. हे नियम पुढील प्रमाणे आहेतः
– नोकरी असली पाहिजे
– हे नेहमीच लक्षात ठेवावे की मला तू कधीच आवडणार नाहीस
– माझी नजर नेहमीच तुझ्यावर असेल
– स्वतः जवळ नेहमीच एक वकील ठेवावा
– ती माझी राजकन्या आहे आणि तू तिला जिंकलेले नाहीये.
– जसा तू माझ्या मुलीशी वागशील, तसाच मी तुझ्याशी वागेन
– जर माझ्या मुलीला त्रास झाला तर मी तुरुंगात जाण्यासही तयार आहे

गुजरातमधील अवैध दारुचा धंदा करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित ‘रईस’ या सिनेमातील उडी उडी जाये.. या गाण्यात गुजरातमधील संक्रातीचा रंग दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. देशभरात मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यातही गुजरातमध्ये मकर संक्रातीची धूम अधिकच असल्याचे पाहायला मिळते. या रंगामध्ये माहिरा आणि शाहरुख खान धूंद झाल्याचे गाण्यामध्ये दिसते. शाहरुखने ट्विटच्या माध्यमातून हे गाणे शेअर केले होते ‘मकर संक्रांती येत आहे…’ दिल की पतंग देखो..उडी उडी जाऐ..’ असे शाहरुखने लिहिले होते.

‘उडी उडी जाये..’ या गाण्याला सुखविंदर सिंग, भूमी त्रिवेदी आणि करसन संगथिया यांनी गायले असून जावेद अख्तर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यापूर्वी ‘रईस’ सिनेमातील ‘लैला मे लैला..’ या सनी लिओनीच्या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या गाण्याच्या माध्यमातून सनी लिओनीने शाहरुखसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. या गाण्याची चर्चा सुरु असतानाच ‘रईस’ सिनेमातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले. आरिजीत सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या आवाजातील ‘ओ जालिम..’ या गाण्यामध्ये माहिला-शाहरुख रोमान्स करताना दिसले होते. या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:30 pm

Web Title: shahrukh khan says if aryan and abram ever hurt a woman he will not leave them
Next Stories
1 सुपरस्टारचा सुपरफॅन; एक लाख रुपयांना विकत घेतले चित्रपटाचे तिकीट
2 ‘क्वांटिको’च्या सेटवर प्रियांका जखमी
3 “मुंबईची सुकन्या” होऊ दे जल्लोष करूया गौरव स्त्री कौशल्याचा
Just Now!
X