शाहरुख खानचा आगामी सिनेमा रईसचा अजून एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रईसच्या डोक्यात स्वतःचा धंदा सुरु करण्याचा विचार कसा येतो हे दाखवण्यात आले आहे. धंदा सुरु करण्यासाठी पाठबळाची नाही तर हिंमतीची गरज असते, अशा पद्धतीची वजनदार वाक्य शाहरुख या प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये शाहरुखचा लूक फार आकर्षक वाटत आहे. डोळ्यांना सुरमा लावल्यामुळे संवाद बोलताना त्याचे डोळे अधिक बोलतात असेच वाटतात. एकंदरीत पठाणी पेहराव आणि अॅक्शनपॅक संवादांमुळे हा प्रोमोही सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

[jwplayer lQmgyBgy]

दरम्यान, या सिनेमाचे उडी उडी जाये हे गाणे ही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. या गाण्यात माहिरा आणि शाहरुख गरबा खेळताना दिसते. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटामधील गाण्यांपेक्षा या गाण्याचे वेगळेपण म्हणजे शाहरुख पहिल्यांदा एखाद्या गाण्यामध्ये गरबा खेळताना दिसला आहे. गुजरातमधील अवैध दारुचा धंदा करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित सिनेमातील या गाण्यात गुजरातमधील संक्रातीचा रंग दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. देशभरात मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यातही गुजरातमध्ये मकर संक्रातीची धूम अधिकच असल्याचे पाहायला मिळते.

उडी उडी जाये..’ या गाण्याला सुखविंदर सिंग, भूमी त्रिवेदी आणि करसन संगथिया यांनी गायले असून जावेद अख्तर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यापूर्वी ‘रईस’ सिनेमातील ‘लैला मे लैला..’ या सनी लिओनीच्या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या गाण्याच्या माध्यमातून सनी लिओनीने शाहरुखसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. या गाण्याची चर्चा सुरु असतानाच ‘रईस’ सिनेमातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले. अरिजीत सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या आवाजातील ‘ओ जालिम..’ या गाण्यामध्ये माहिला-शाहरुख रोमान्स करताना दिसले होते.  या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्येही ती बऱ्याच वेळासाठी दिसली होती. पाकिस्तानी कलाकारांविरोधामुळे माहिला बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे या गाण्यासोबतच सिनेमाबाबतही तिच्याकडे प्रेक्षकांची पाहण्याची दृष्टी काय असणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरले आहे.

रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे. २५ जानेवारीला सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन्ही सिनेमे आता एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

[jwplayer ZoqKYG24]