25 February 2021

News Flash

सरप्राईज! …म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात

नेमकं काय घडलं? सिद्धार्थने का ढकललं शहनाजला?

बिग बॉस १३ मधील सर्वाधिक गाजलेली जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल. बिग बॉसच्या घरात या दोघांची उत्तम केमिस्ट्री जमल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे प्रत्येक टास्कमध्ये किंवा कोणत्याही भांडणामध्ये या दोघांनी कायमच एकमेकांची पाठराखण केली. त्यामुळे पडद्यावर एकत्र वावरणारी ही जोडी पडद्यामागेही चाहत्यांच्या तितकीच पसंतीत उतरली. परंतु, सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात सिद्धार्थने शहनाजला पाण्यात ढकलल्याचं पाहायला मिळालं.

शहनाजने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शुक्लाने तिला स्विमिंगपूलमध्ये ढकलल्याचं दिसून येत आहे. शहनाजने नुकताच तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला असून या बर्थ डे पार्टी सेलिब्रेशनमधील हा व्हिडीओ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाजला हटके पद्धतीने बर्थ डे विश करण्यासाठी सिद्धार्थने ही युक्ती लढवली होती. शहनाजने वयाच्या २७ व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे सिद्धार्थने २७ पर्यंत आकडे मोजले आणि तिला थेट पाण्यात ढकलून दिलं. यावेळी सिद्धार्थ बरोबर त्याचे काही मित्र आणि शहनाजचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

वाचा : नको तेच घडलं! सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती…

दरम्यान, शहनाजच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. शहनाज- सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांना विशेष भावत असून त्यांनी सिडनाज हे टोपणनावदेखील या जोडीला दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 11:13 am

Web Title: shehnaaz gill got birthday bumps from siddharth shukla video goes viral ssj 93
Next Stories
1 हृतिक घालवतोय मुलांसोबत वेळ, फोटो व्हायरल
2 Video : अभिनय कोळून प्यायलेल्या जितेंद्र जोशीच्या करिअरचा प्रवास
3 नको तेच घडलं! सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती…
Just Now!
X