22 October 2020

News Flash

एक शूज राज कुंद्रांचा घातला का? आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल

...म्हणून नेटकऱ्यांनी उडवली शिल्पाची खिल्ली

बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या फॅशन सेन्स आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. त्यामुळे सेलिब्रिटींनी कोणतीही नवीन फॅशन कॅरी केली की चाहत्यांमध्ये तो चर्चेचा विषय ठरतो. यात अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे ट्रोलदेखील व्हावं लागत. असाच प्रकार अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत घडला आहे. शिल्पा तिच्या शूजमुळे चर्चेत आली असून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

सध्या व्हायरल होत असलेला शिल्पाचा फोटो एअरपोर्टवरील असून विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शिल्पा प्रचंड क्लासिक लूकमध्ये दिसत आहे. मात्र, तिने घातलेल्या शूजमुळे ती ट्रोल झाली आहे.

शिल्पाने नव्या स्टाइलचे शूज घातले होते. यात तिच्या दोन्ही शूजचा रंग वेगवेगळा होता. त्यामुळे तिची ही आगळीवेगळी फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. ‘एक शूज राज कुंद्रा सरांचा घातलास का?’ असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. तर ‘इतकी काय घाई होती की, गडबडीत दोन वेगवेगळ्या रंगाचे शूज घातले’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

#shilpahetty back from her shoot in a private plane #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शूटच्या निमित्ताने मनालीत गेलेली शिल्पा तिच्या प्रायव्हेट जेटने मुंबईत परतली. यावेळी तिचा हा एअरपोर्ट लूक चर्चेत आला होता. शिल्पा कायमच तिच्या फॅशनसेन्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. शिल्पाचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 3:31 pm

Web Title: shilpa shetty return after shooting in mismatched shoes ssj 93
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये ‘या’ मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण!
2 म्हणून चित्रपटाचे ‘कंचना’ नाव बदलून ‘लक्ष्मी बॉम्ब’ ठेवले, दिग्दर्शकाने केला खुलासा
3 सारा,इब्राहिमपेक्षा तैमूरवर जास्त प्रेम का? सैफ म्हणतो…
Just Now!
X