करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपूर्ण देशात पहायला मिळतोय. करोना विषाणूच्या संसर्गाने आपल्यापैकी अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. या सगळ्या परिस्थितीपुढे हतबल होत लोक भावूक होताना दिसत आहेत. अशात बॉलिवूडची ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टीने करोना परिस्थितीबाबत मनातली गोष्ट व्यक्त केलीय. “सगळं काही सुरळीत होईल”, असं म्हणत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लोकांना सकारात्मक केलंय.

बॉलिवूडची ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती तिच्या चाहत्यांसोबतचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती योगा करताना दिसून येतेय. हा फोटो शेअर करताना अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या मनातली गोष्ट व्यक्त केलीय.

यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “आपण सर्वच जण आजुबाजूला घडणाऱ्या वास्तविक परिस्थितीसंदर्भात वाचतोय आणि हे सर्व मात्र विनाशकारी आहे. या सगळ्या बातम्या आपल्या मनावर परिणाम करतात आणि आपल्याला शून्याकडे घेऊन जातात. त्यानंतर पुन्हा कुणीतरी गरजवंताची मदत केल्याची एखादी पोस्ट आपल्या नजरेसमोर येते. कोव्हिड रूग्णांसाठी जेवण बनवणारे कितीतरी लोक हे एकटे राहतात, अनेक प्रतिनिधी तर गरजू रूग्णांना ऑक्सिजन व बेड्स पुरवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत तर डॉक्टर्स देखील कोव्हिड काळातली उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन सेशन करत आहेत.सगळंच अस्वस्थ करणारं आहे…”

यापुढे लिहिताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली, “जर आपण कुणासाठी काहीतरी करू शकणार असाल तर ते नक्कीच करायलं हवं…जर करू शकलो नाही तरी त्याचा त्रास करून घेऊ नका…थोड्या वेळासाठी बाहेर जा…मोठा श्वास घ्या…आणि यावर विश्वास ठेवा की इथून पुढे सगळं चांगलंच होणार आहे… वर्तमानकाळात जगा…सोबतच ही अडचण आपण नक्कीच दूर करु…इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत..सध्या आपल्या सगळ्यांना विश्वास आणि आशा बाळगण्याची खूप गरज आहे.”

काही दिवसांपुर्वीच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात सध्याच्या करोना परिस्थितीवर बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू येऊन भावूक झालेली दिसून आली होती. या कठीण काळात तिने लोकांना एकमेकांची मदत करण्याचं आवाहन केलंय.