News Flash

कुंभमेळ्यात सहभागी झाले होते श्रवण अन् झाली करोनाची लागण

मुलाने दिली याविषयी माहिती

नदीम श्रवण या संगीतकार जोडीतले श्रवण यांचं काल करोनामुळे निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. करोना आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि ते दवाखान्यात उपचार घेत होते. आता अशी माहिती समोर येत आहे की, ते कुंभमेळ्याला गेले होते.

श्रवण आणि त्यांची पत्नी हे दोघेही कुंभमेळ्याला गेले होते. ते परत आल्यावर श्रवण यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर ते आणि त्यांची पत्नी या दोघांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. श्रवण यांचा मुलगा संजीवने याबद्दल माहिती दिली आहे. तो इंडियन एक्सप्रेसशी बोलत होता. तो म्हणाला, “आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्हाला अशा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. माझ्या वडिलांचं निधन झालं आहे, मी आणि माझी आई करोनाबाधित आहोत. माझ्या भावालाही करोनाची लागण झाली आहे आणि तो सध्या गृहविलगीकरणात आहे”.

हेही वाचा- संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनामुळे निधन

तो पुढे म्हणाला, “माझी आई विमलादेवी आणि मी एकत्रच आहोत. आम्ही दोघेही आता बरे होत आहोत. अशा काही अफवा ऐकायला मिळत आहेत की हॉस्पिटल आम्हाला आमच्या वडिलांचे शव देत नाहीत, तेही बिलाच्या समस्येमुळे..पण हे खरं नाही. हॉस्पिटलने आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे”.

श्रवण गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. काल रात्री त्यांचं निधन झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 11:59 am

Web Title: shravan visited kumbh mela before testing positive for corona virus vsk 98
Next Stories
1 Corona Crisis: व्यथित सुहाना खानला भेटायला गौरी आणि आर्यन न्यू यॉर्कला रवाना
2 नदीम-श्रवण जोडीतले श्रवण यांचं निधन; या मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
3 “असं वापरा मास्क”, माधुरी दीक्षित देतेय मास्क वापरण्याचे धडे
Just Now!
X