30 May 2020

News Flash

या विनायक चतुर्थीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दु:खहर्ता ‘श्री गणेश’

निर्माते धीरज कुमार यांनी काही वर्षांपूर्वी या पौराणिक मालिकेची निर्मिती केली होती.

लॉकडाउनमध्ये ‘रामायण’, ‘महाभारत’ या पौराणिक मालिका पुन्हा सुरू झाल्या आणि प्रेक्षकांचा या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शूटिंग बंद असल्यामुळे यासोबतच इतरही वाहिन्यांवर जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्या. त्यातच आता आणखी एक प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा प्रसारित होणार आहे.

गणपती बाप्पा म्हणजे अगदी लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकाचं लाडकं दैवत. याच लाडक्या दैवताची गोष्ट स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ‘श्री गणेश’ या पौराणिक मालिकेतून. मंगळवारी २६ मे रोजी विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर ही पौराणिक मालिका सुरु होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता बाप्पाचा महिमा प्रेक्षकांना अनुभवता येईल.

आणखी वाचा : एकेकाळी जेवायलाही पैसे नव्हते; तेजस्विनी पंडितची संघर्षकथा

बाप्पाच्या जन्माची कथा आपण ऐकली आहेच. ही गोष्ट स्टार प्रवाहवरच्या श्री गणेश मालिकेतून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलाय. बाप्पाच्या आगमनाची ओढ प्रत्येक भक्ताच्या मनात आहे. त्यामुळे बाप्पाचा अगाध महिमा मालिकेतून अनुभवायला मिळणं ही प्रत्येकासाठीच अनोखी पर्वणी असेल. निर्माते धीरज कुमार यांनी काही वर्षांपूर्वी या पौराणिक मालिकेची निर्मिती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 10:12 am

Web Title: shree ganesh marathi mythological serial to start again on star pravah ssv 92
Next Stories
1 एकेकाळी जेवायलाही पैसे नव्हते; तेजस्विनी पंडितची संघर्षकथा
2 शहनाज गिलच्या वडिलांनी बलात्काराचा आरोप फेटाळला
3 धक्कादायक! अभिनेता आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X