News Flash

‘सांग तू आहेस का’; सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या मालिकेची उत्सुकता

लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक हटके आणि नव्या धाटणीची मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘सांग तू आहेस का’. सध्या या मालिकेच्या प्रोमोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असं म्हणतात. ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. खास बात म्हणजे लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिकेत असून ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “एखादी गोष्ट रसिकांना खिळवून ठेवते त्यांची उत्कंठा वाढवते असं ऐकलं की ती गोष्ट सांगायला अजून हुरुप येतो. सांग तू आहेस का अशीच मालिका आहे. त्याचं कथानक अनेक प्रश्न पडत पुढे पुढे सरकणारं आहे. लव्हस्टोरी आणि त्यात गूढ असा या मालिकेचा बाज असल्यामुळे पुढे काय उलगडेल याची हुरहुर सतत मनाला लागून राहिल.”

आणखी वाचा : हेमांगी कवीचं मुंबईत ‘घरकुल’; ‘म्हाडा’मध्ये सलग आठ वर्षे प्रयत्न केल्यानंतर लागली लॉटरी

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘सांग तू आहेस का’ या मालिकेचे निर्माते विद्याधर पाठारे असून दिपक नलावडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘जिवलगा’ या मालिकेनंतर सिद्धार्थ चांदेकरला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 1:18 pm

Web Title: siddharth chandekar new serial sang tu aahes ka coming soon ssv 92
Next Stories
1 “अल्ट बालाजी पॉर्न तयार करत नाही”; अभिनेत्याचा एकता कपूरला पाठिंबा
2 बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतोस? अक्षय कुमार म्हणाला…
3 ‘मनी हाइस्ट’मधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ
Just Now!
X