हॉलीवूड चित्रपट ‘वॉरियर’चा बॉलीवूडमध्ये रिमेक करण्यात येणार आहे. यासाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेत आहे.
या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असून, सध्या चित्रपटाचे तात्काळ शिर्षक ‘वॉरियर’ असेच ठेवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा एकमेकांना मार्शल आर्ट सामन्यात एकमेकांना सामोरे जाणा-या दोन भावांवर आधारित आहे. माझा पुढील चित्रपट अतिशय रोमांचक आहे. त्याची कथा खूप मनोरंजक असून यात दोन कलाकारांच्या अभिनयासाठी वाव आहे. मार्शल आर्ट आणि फायटिंगचे यात मिश्रण असणार आहे. यासाठी मी लवकरच ट्रेनिंग घेण्यास सुरुवात करणार आहे, असे सिद्धार्थ पीटीआयशी बोलताना म्हणाला. ‘वॉरियर’मध्ये सिद्धार्थ हा अक्षय कुमारसोबत काम करताना दिसण्याची शक्यता आहे. मात्र, अक्षयकडून याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असेही सिद्धार्थ म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
वॉरियर रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय
हॉलीवूड चित्रपट 'वॉरियर'चा बॉलीवूडमध्ये रिमेक करण्यात येणार आहे. यासाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेत आहे.
First published on: 13-06-2014 at 11:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra to work with akshay kumar in warrior remake