अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. बिग बॉसच्या १३व्या पर्वात या जोडीने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सध्या या जोडीचे एक गाणे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्याने चक्क शकिराच्या ‘वाका वाका’ या गाण्याचा विक्रम मोडला आहे.
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचे ‘भूला दुंगा’ हे गाणं सध्या चर्चेत आहे. “एक पल में तुमको मैं भुला दूँगा, दिल तोड़ने की ये सज़ा दूँगा, एक पल में तुमको मैं भुला दूँगा, दिल तोड़ने की ये सज़ा दूँगा” असे या गाण्याचे बोल आहेत. २४ मार्चला हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे हे गाणं इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की गेल्या १२ दिवसांमध्ये तब्बल ५ कोटी ९० लाख ४० हजारांपेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं. तसंच या गाण्यावर १० लाखांपेक्षा अधिक कॉमेंट आल्या आहेत.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार भुला दुंगा या गाण्याने शकिराच्या ‘वाका वाका’ गाण्याचा विक्रम मोडला आहे. २०१० साली फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्याने १० दिवसांमध्ये जवळपास पाच कोटी व्हूज मिळवले होते. या गाण्याचा विक्रम तब्बल १० वर्षानंतर एका भारतीय गाण्याने मोडला आहे.