24 February 2021

News Flash

Video : आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी तयार केलं जेवण; शेतकरी आंदोलनात रुपिंदर हांडाचा सहभाग

शेतकरी आंदोलनाला रुपिंदर हांडाचा पाठिंबा

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली असून दिल्ली सीमेवर सध्या हे आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांना देशभरात अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यात सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. यात पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांज आणि गायिका रुपिंदर हांडा हे सातत्याने शेतकऱ्यांची मदत करत असून त्यांना पाठिंबा देत आहेत. अलिकडेच रुपिंदरने या शेतकऱ्यांसाठी स्वत:च्या हाताने जेवण तयार केल्याचं पाहायला मिळालं.

सध्या सोशल मीडियावर रुपिंदरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ रुपिंदरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतकऱ्यांसाठी लंगर करत आहे. यात तिने तिच्या हाताने ब्रेक पकोडासाठी बेसनाचं पीठ तयार केलं आहे. तर दुसरीकडे ती रोटी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेवण करण्यासोबतच ती त्यांचं मनोरंजनदेखील करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या रुपिंदर टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेली आहे.


“टिकरी बॉर्डवर आज लंगर सेवा करण्याची संधी मिळत आहे. वाहेगुरु भला करे”, असं कॅप्शन रुपिंदरने या व्हिडीओला दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 10:00 am

Web Title: singer rupinder handa making bread pakodas and chapati for farmers in border video viral ssj 93
Next Stories
1 आदित्य नारायणने पत्नीसाठी खरेदी केला ५ बीएचके फ्लॅट
2 …म्हणून एका रात्रीतून मुंबईमधून शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर आले होते उतरवण्यात
3 आमिर खानच्या मुलीने पोस्ट केला बिकिनी लूकमधला हॉट फोटो
Just Now!
X