जगावर करोनाचं संकट आहे. त्यामुळे प्रत्येक देश या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये देशातही ३ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात देशातील अनेक कंपन्या, व्यावसाय ठप्प झाले आहेत. यात कलाविश्वाचाही समावेश आहे. अनेक चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज यांचं चित्रीकरण, प्रमोशन सारं काही बंद झालं आहे. त्यामुळे कलाकारही घरीच आहेत. मात्र या लॉकडाउनच्या काळतही एक अभिनेत्री काम करत असून तिने नुकतंच एका मासिकासाठी फोटोशूट केलं आहे.
लॉकडाउन असल्यामुळे एकीकडे सारी कलाकार मंडळी घरी राहून घरातल्यांसोबत वेळ घालवत आहेत. तर दुसरीकडे मात्र दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शोभिता धूलिपाला काम करण्यात व्यस्त आहे. शोभिताने नुकतंच एका मासिकासाठी फोटोशूट केलं असून त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे घराच्या बाहेर न पडता तिने हे फोटोशूट केलं आहे.
शोभिताने घरी राहून ‘कॉस्मोपॉलिटन इंडिया’साठी फोटोशूट केलं असून तिने सेल्फ-शॉट कवरशूट केलं आहे. इतकंच नाही तर या फोटोशूटसाठी ती स्वत:च तिची मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टालिश झाली आहे.
दरम्यान, या फोटोशूटसाठी तिने स्वत:च्या मेकअप करुन हेअरस्टाइल तसंच फोटोशूटसाठी जागा आणि पोझ निवडल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने घरात राहून फोटोशूट करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिचे फोटो पाहून हे सेल्फ-शॉट कवरशूट तिने केलंय यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.