News Flash

सोनाली कुलकर्णीने स्वीकारलं ३७ दिवसांचं फिटनेस चॅलेंज

जाणून घ्या, तिच्या या फिटनेस चॅलेंजबद्दल

सोनाली कुलकर्णी

उत्तम आरोग्य ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाउनमध्ये घरातच बसावं लागत असल्यामुळे, अनेकांच्या फिटनेसवर परिणाम झालेला दिसत आहे. अर्थात, घरी राहूनही फिटनेसची काळजी घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. घरच्या घरी व्यायाम आणि डाएटचा फंडा वापरून, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धेची परीक्षक आणि मराठीतली आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेसुद्धा फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे.

सोनाली सध्या तिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत दुबईमध्ये राहत आहे. दुबईमध्येच तिचा नुकताच साखरपुडा झाला. तिथेच सोनालीने सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर प्रणितचं ३७ दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं. ३७ दिवसांच्या या फिटनेस चॅलेंजच्या काळात, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रणितच्या संपर्कात राहून, तिने नियमित डाएट आणि वर्कआऊट केलं. या ३७ दिवसांच्या काळात, ती दिवसातून ४ तास वर्कआऊट करत होती. या दिवसांत तिने साखर खाणं पूर्णपणे बंद केलं. सकाळच्या वेळात, रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्यावर तिने भर दिला. अर्थात, जिम बंद असल्यामुळे आणि व्यायामासाठी घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, घरच्या घरीच वर्कआऊट करावे लागत होते. या सर्व मेहनतीमध्ये कुणाल सुद्धा सहभागी होता. दोघांनी मिळून प्रणितचं फिटनेस चॅलेंज पूर्ण केलं.

या अनोख्या चॅलेंजबद्दल सोनालीने सांगितलं, ” युवा डान्सिंगचे शूट सुरु असताना मला प्रणितचा कॉल आला होता. मात्र तेव्हा व्यग्र वेळापत्रकामुळे मला ते जमलं नाही. लॉकडाउनमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त प्रणितने हे चॅलेंज मला गिफ्ट केलं. रोज व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रणित च्या संपर्कात राहणं सोपं होतं. मी करत असलेले वर्कआऊट योग्य आहे की नाही, याकडे लक्ष देणं, योग्य त्या सूचना करणे, यासाठी आम्ही व्हिडिओ कॉलचा प्रभावी वापर केला. फिट राहण्याचा हा फंडा मला खूप आवडला. हा फिटनेस क्लास प्रणितच्या मार्गदर्शनाखाली मी पुढेही सुरु ठेवीन.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 3:34 pm

Web Title: sonalee kulkarni completed 37 days fitness challenge during lockdown ssv 92
Next Stories
1 सुशांतसाठी अभिषेक कपूर करणार अन्नदान; पत्नीही देणार साथ
2 सुशांत ‘तिच्या’मुळे नाकारु शकला होता यशराजचा मोठा चित्रपट; दिग्दर्शकाचा खुलासा
3 ‘मरणं सोपं आहे पण जगणं कठीण’; मराठी कलाकाराची मदतीसाठी भावनिक साद
Just Now!
X