News Flash

सोनालीने कर्करोगावरील उपचार घेतानाचा जुना फोटो केला ट्वीट; म्हणाली…

सोनालीने कॅन्सर झाल्याची माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता

सोनालीने कॅन्सर झाल्याची माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सोनाली बेंद्रे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोनाली तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत काही संदेशही चाहत्यांना देताना दिसते. रविवारी सोनालीने केलेले ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये तिने कर्करोगाशी झुंज देत असतानाचा फोटो आणि आताचा फोटो शेअर केला आहे.

सोनालीने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करत एक संदेश दिला आहे. या फोटोमध्ये ती हॉस्पिटलमध्ये असून कर्करोगाशी झुंज देत असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत तिने “काळ किती लवकर निघून जातो. जेव्हा मी भूतकाळात डोकावून पाहाते तेव्हा माझी लढण्याची ताकद, माझा विकनेस या सर्व गोष्टी आठवतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी ‘C’ या शब्दाला माझ्या नंतरच्या जीवनावर परिणाम करुन दिला नाही” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सोनाली बेंद्रेची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या सोनालीने कॅन्सरची माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र सोनाली या आजाराला खंबीरपणे सामोरी गेली. या आजारपणामध्ये सोनाली कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. इतकंच नाही तर तिने सहजरित्या या आजारावर मातदेखील केली. मात्र या संकटातून मार्ग काढण्यासाठी अभिनेत्री मनिषा कोईराला आणि क्रिकेटपटू युवराज सिंग यांची संघर्षगाथा कामी आल्याचे सोनालीने सांगितले होते. आता सोनालीने तो कठीण काळ आठवत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 2:32 pm

Web Title: sonali bendre shares before and after picture of recovery defined by c word avb 95
Next Stories
1 मार्वल स्टुडिओच्या ‘मिस मार्वल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा
2 सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच – अन्विता फलटणकर
3 ‘साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
Just Now!
X