News Flash

‘विक्की वेलिंगकर’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नुकताच चित्रपटातील आणखी एका व्यक्तीरेखेवरुन पडदा उचलण्यात आला आहे

‘हिरकणी’ चित्रपटातून घराघरामध्ये पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आता सोनालीचा ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनालीसह अभिनेत्री स्पृहा जोशी झळकणार आहे. नुकताच चित्रपटातील आणखी एका व्यक्तीरेखेवरुन पडदा उचलण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे.

‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात सोनाली आणि स्पृहासोबतच मराठीतील अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनय करणारा अभिनेता संग्राम समेळ एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आता लवकरच तो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी संग्रामने त्याचे सिनेमातील पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. संग्राम समेळ पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

“विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे,” असे चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ म्हणाले आहेत.

आणखी वाचा : ‘हिरकणी’नंतर सोनाली कुलकर्णी दिसणार अनोख्या भूमिकेत

सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 6:48 pm

Web Title: sonali kulkarni vicky velingkar release date avb 95
Next Stories
1 सिद्धार्थच्या मॉडेलिंगचा फोटो शेअर करत रितेशने उडवली खिल्ली
2 कोणी तरी थांबवा याला! लग्नाच्या वाढदिवसासाठी रणवीरची जोरदार तयारी
3 रोहित, इम्राननंतर आता दिशानेही घेतली नवी कार, किंमत ऐकली का??
Just Now!
X