News Flash

सुबोध भावे विचारतोय, ‘काय स्टॉक संपला ना?’

कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी पोस्ट केले फोटो...

सुबोध भावे

करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीसुद्धा घरीच बसले आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. हे कलाकार घरी बसून काय करत आहेत, ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगत आहेत. अभिनेता सुबोध भावेने नुकतंच ट्विट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. पण या ट्विटमधील पहिली ओळ वाचून तुमच्या भुवया उंचावतील. ‘काय स्टॉक संपला ना’, असा प्रश्न त्याने चाहत्यांना विचारला आहे. पण यामागचं कारण मात्र वेगळं आहे.

सुबोधने ट्विट करत विचारलं, ‘काय स्टॉक संपला ना? गैरसमज नको. घरी असलेल्या पुस्तकांचा विचारतोय मी. कुठलं पुस्तक वाचताय?’ याचसोबत तो सध्या काय वाचतोय, हेसुद्धा त्याने सांगितलं. ‘मी सध्या अमिशचं रावण, शेषराव मोरे यांचे ‘मुस्लिम मनाचा शोध’ आणि ऋषिकेश गुप्ते यांचं नवीन आलेला संग्रह’, असं तो म्हणाला.

आणखी वाचा : रामायण : हनुमानाने पर्वत उचलताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस 

सुबोधच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला असून अनेकांनी पुस्तकांचे फोटो पोस्ट करत आपण काय वाचतोय, हे सांगितलंय. एरव्ही सतत शूटिंगमध्ये व्यस्त असणारे हे कलाकार आता क्वारंटाइनमध्ये आपल्या आवडीच्या गोष्टी करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 6:31 pm

Web Title: subodh bhave cryptic post for fans during lockdown ssv 92
Next Stories
1 कंगनाच्या बहिणीची टिवटिव बंद; फराह खानने मानले ट्विटरचे आभार
2 गॅरेजमधील टेलरनं शिवला होता सुष्मिताचा ‘मिस इंडिया’चा ड्रेस
3 अभिनय पाहून टिक-टॉक गर्लला दिली चित्रपटाची ऑफर, नंतर केलं ट्विट डिलिट
Just Now!
X