प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या ७४ वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. अनेक कलाकारांनी बालसुब्रमण्यम यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. मराठमोळा अभिनेता सुमीत राघवनने देखील श्रद्धांजली वाहत त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सुमीतने त्याच्या ट्विटमध्ये बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘अप्रतिम… केवळ अप्रितम’ असे म्हणत त्याने बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अप्रतिम… केवळ अप्रतिम… #SPBalasubrahmanyam https://t.co/lwTCXjXbJn
— Sumeet Raghvan (@sumrag) September 26, 2020
आज बालसुब्रमण्यम आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम आहेत. बालसुब्रमण्यम हे अभिनेता सलमान खान याचा आवाज म्हणून खास ओळखले जात होते. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे एवढंच नाही तर एका दिवसात २१ गाणी म्हणण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.