29 May 2020

News Flash

‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतण्यावर अखेर सुनीलने सोडलं मौन

सुनील ग्रोव्हर व कपिल शर्मा हे दोन कॉमेडियन पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी लाखो चाहत्यांची इच्छा आहे.

सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हर व कपिल शर्मा हे दोन कॉमेडियन पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी लाखो चाहत्यांची इच्छा आहे. सुनीलच्या एका ट्विटनंतर चाहत्यांमध्ये कुठेतरी ही आशा निर्माण झाली होती. रविवारी सुनीलने एक सूचक ट्विट केलं होतं, ज्यानंतर त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतण्याविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या सर्व चर्चांवर त्याने अखेर मौन सोडलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीलने स्पष्ट केलं, ”माझ्या ट्विटमध्ये सूचक असं काही नव्हतं त्यामुळे कपिल शर्मा शोमध्ये परतण्याविषयी चर्चा का होत आहे हेच मला कळत नाहीये. या चर्चेत काहीच तथ्य नाही. हे शक्यसुद्धा नाही. लोकांनी त्या ट्विटच्या प्रतिक्रियांमध्ये मला विनंती केली की परत ये पण त्या प्रतिक्रियांचा अर्थ मी परत येणार आहे असा होत नाही.”

”या सर्व चर्चा तथ्यहीन असून मला त्यावर फार काही बोलायचं नाही आहे. भविष्यात तसं काही असल्यास मी स्वत: त्याचा खुलासा करेन,” असंही तो पुढे म्हणाला. यावेळी सुनीलने त्याच्या आगामी प्लॅन्सविषयीही सांगितले. लवकरच तो वेबच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार असल्याचं त्याने सांगितलं.

Next Stories
1 सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा सन्मान!
2 Video : राजकुमार राव-मौनीच्या ‘मेड इन चायना’चा ट्रेलर प्रदर्शित
3 …म्हणून आई होण्याची मल्लिकाला वाटतेय भीती
Just Now!
X