09 March 2021

News Flash

सुनील ग्रोवर, शिल्पा शिंदे कपिल शर्माविरुद्ध उभे ठाकणार?

कपिल आणि सुनीलमधला वाद जगजाहीर आहे

'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ हा शो २५ मार्चपासून सुरू होत आहे.

कपिल आणि सुनील शर्मा या दोन विनोदवीरांमधला वाद जगजाहीर आहे. एकेकाळी पडद्यावरील ही सुपरहिट ठरलेली जोडी एका वादानंतर वेगळी झाली. या दोघांच्या मैत्रीत कायमचं वितुष्ट आलं. तरीही या दोघांनी वाद विसरून पुन्हा एकदा एकत्र यावं अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. सुनीलसह इतर कलाकारांसोबत झालेल्या वादानंतर कपिलचा शो काही दिवसांत बंद पडला. पण कपिल या महिन्यात पुन्हा नव्या शोसह छोट्या पडद्यावर परतणार आहे. कपिलच्या नव्या शोमध्ये सुनील दिसण्याची शक्यता तशी कमीच. पण आता मनोरंजन विश्वात रंगलेल्या नव्या चर्चेनुसार सुनील पुन्हा एकदा कपिलविरुद्ध उभा ठाकला असून तोदेखील आपला नवा शो घेऊन येणार असल्याच्या चर्चा आहे. विशेष म्हणजे शिल्पा शिंदे नुकतीच सुनीलसोबत दिसल्यानं हे दोघंही नव्या शोमार्फत कपिलला टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या दिवशी, या वेळी पाहता येणार ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’

सध्या सुनील वेगवेगळ्या कार्यक्रमात व्यग्र आहे. शिल्पानं नुकताच बिग बॉस रिअॅलिटी शोचा किताब पटकावला आहे. या शोमधील विजेत्याला चॅनेलसोबत एक करार करावा लागतो त्यानुसार शिल्पा कलर्सच्या एखाद्या कार्यक्रमात दिसेन हे नक्कीच. पण हा कार्यक्रम कदाचित कॉमेडी शो असू शकतो आणि त्यात सुनीलदेखील असू शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे. या शक्यतांची चर्चा होत असतानाच निर्माती प्रीति सिमोस हिनं शिल्पा आणि सुनीलाचा फोटो इन्स्टाग्रावर शेअर केल्यानं या शक्यता प्रत्यक्षात उतरतील असंही अनेकांचं म्हणणं आहे. पण या चर्चांवर सुनील आणि शिल्पानं अजूनही मौन बाळगणं पसंत केलं आहे.  २५ मार्चला कपिलचा हा शो सुरू होत आहे. ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ असं या शोचं नाव असणार आहे. यात कपिलसोबत सुनील नसला तरी चंदन प्रभाकर आणि किकू शारदा मात्र दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:52 pm

Web Title: sunil grover teams up with shilpa shinde to fight kapil sharma
Next Stories
1 Video: कतरिना- आमिरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
2 VIDEO : …म्हणून व्हायरल होतोय आलियाच्या बालपणीचा व्हिडिओ
3 Video : १, २, ३…. आणि ‘मोहिनी’ परत आलीये..
Just Now!
X