बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे अभिनेत्री सनी लिओनीला मात्र जबर धक्का बसला आहे. “नैराश्यातून बाहेर पडणं दिसतं तेवढं सोपं नाही हा अनुभव मी घेतला आहे.” असं म्हणत तिने सुशांतसाठी दु:ख व्यक्त केलं आहे.
“तुम्ही सगळे खोटारडे आहात, इथं कोणी कोणाला मदत करत नाही”; अभिनेत्याने बॉलिवूडला दाखवला आरसा
काय म्हणाली सनी लिओनी?
“नैराश्यात असलेल्या इतर व्यक्तीला सल्ला देणं सोपं असतं. परंतु तेच सल्ले स्वत: नैराश्यामध्ये असताना आत्मसाद करणं खूप कठीण असतं. ड्रिपेशनमध्ये असताना सर्वत्र दुखाची जाणीव होते. हसणं आपण विसरुन जातो. अशा परिस्थितीत आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यायला हवा. हा नैराश्याचा अनुभव मी देखील घेतला. दु:खाची बाब म्हणजे आत्महत्या करणं सुशांतसाठी शेवटचा पर्याय होता.” अशा आशयाचा ब्लॉग लिहून सनीने इन्स्टाग्रामद्वारे सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अवश्य पाहा – सुशांतचं पोस्टमॉर्टम आधी करण्यात आली करोना चाचणी, कारण…
सुशांतचा थक्क करणारा प्रवास
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.