20 October 2020

News Flash

‘मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे’, सुशांतचा जुना व्हिडीओ व्हायरल

रियाने मुलाखतीमध्ये सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे सांगताच तिला सुनावण्यात आले होते

विधानावरून वादंग उठल्याचे लक्षात येताच अरुण यादव यांनी सावरासारव करण्याचा प्रयत्नही केला. "सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. आमचे नेते तेजस्वी यादव यांनीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. नालंदामध्ये उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीला सुशांतचं नाव देण्याची मागणीही आम्ही केली आहे," असं यादव म्हणाले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी रोज वेगळी माहिती समोर येत आहे. नुकताच ‘आजतक’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे म्हटले होते. सुशांतला विमानात बसायला भीती वाटायची आणि तो विमानात बसण्यापूर्वी काही औषधे घ्यायचा असे रियाने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या विषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान सुशांतच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत ‘क्लॉस्ट्रोफोबिया’ विषयी बोलताना दिसत आहे.

सुशांतने एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याला ‘क्लॉस्ट्रोफोबिया आणि इन्सोमनिया (झोप न येणे)’ असल्याचे म्हटले होते. ‘मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे आणि इन्सोमनिया असल्यामुळे मी फक्त दोन तास झोपतो’ असे सुशांत बोलताना दिसत आहे. सुशांतची ही मुलाखत पाहता रियाने दिलेली माहिती खरी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रियाने सुशांतला विमानात बसण्याची भीती वाटते हे सांगताच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत रियाला सडेतोड उत्तर दिले होते. तिने इन्स्टाग्रामवर सुशांतचा विमान उडवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ शेअर करत, ‘हे क्लॉस्ट्रोफोबिया claustrophobia आहे का? तुला नेहमीच विमान उडवायचं होतं आणि तू ते करून दाखवलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे’ असे तिने म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

Is this #claustrophobia ? u always wanted to fly and u did it .

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिया म्हणाली, ‘युरोप ट्रिपला जाताना सुशांतने मला सांगितले होते की त्याला विमानात बसताना भीती वाटते. त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे आणि त्यासाठी तो एक औषध घेत होता. त्या औषधाचे नाव modafinil असे होते. त्याच्याकडे हे औषध कायम असायचे. युरोप ट्रिपला जाताना विमानात बसण्यापूर्वी त्याने ते औषध घेतले होते.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 10:20 am

Web Title: sushant singh rajput said in an interview that he had claustrophobic and insomniac avb 95
Next Stories
1 ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील बीग बिंचा ‘कूल लूक’ ; पाहा KBC 12चा प्रमो
2 रियाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी
3 ‘दररोज प्रेक्षकांना हसवणे आव्हानात्मक’
Just Now!
X