News Flash

“पडलीस ना गटारात”; ‘तारक मेहता…’मधील बबीताच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

मुनमुम दत्ताचे हे फोटो २०१७ सालातील आहेत. या फोटोत ती मडबाथचा आनंद लुटताना दिसत आहे.

(Photo-instagram@mmoonstar)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. अभिनयासोबतच मुनमुन सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच लक्ष वेधू घेत असते. नुकतेच मुनमुनने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो तुफान व्हायरल होतं आहेत. या फोटोंमुळे बबीता चर्चेतही आलीय.

बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो २०१७ सालातील आहेत. या फोटोत ती मडबाथचा आनंद लुटताना दिसत आहे. मुनमुनने जॉर्डनमधील ‘डेड सी’ च्या समुद्र किनाऱ्यावर मडबाथ घेत असतानाचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मोनोकिनी परिधान केलेल्या मुनमुनने तिच्या संपूर्ण शरीरावर समुद्र किनाऱ्यावरील मातीचा लेप लावल्याचं दिसतंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ” डेड सी आणि आरोग्यदायी मड बाथ…जॉर्डन २०१७”. मुनमुन दत्ताचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा: “तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता”; ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by (@mmoonstar)

हे देखील वाचा: “तुझे हात सापळ्यासारखे दिसतात” म्हणणाऱ्या ट्रोलरला छवि मित्तलचं उत्तर; म्हणाली “एक महिला असून…”

मड बाथ घेतानाच्या मुनमुन दत्ताच्या या फोटोंना तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहेत. अनेक नेटकऱ्यांनी मात्र तिची खिल्ली उडवली आहे. एक नेटकरी म्हणाला, “जेठालालला बोलवा कुणी” तर दुसरा म्हणाला, “छोटी गंगा बोलून नाल्यात बुडवलं” आणखी एक युजर म्हणाला, “म्हणून म्हणातात एवढी पिऊ नये, पडलीस ना गटारात” तर अनेक जणानी ‘रन’ सिनेमातील गाजलेला डायलॉग ‘छोटी गंगा कहेके नाले में डुबा दिया’ ही कमेंट करत खिल्ली उडवली आहे.

mummun-dutta-viral-post (Photo-instagram@mmoonstar)

मुनमुन दत्ताच्या या फोटोंना तुफान लाईक्स देखील मिळाले आहेत. या आधी मुनमुन दत्ताला एका व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. एका विशिष्ट समाजाबद्दल वापरलेल्या आपत्तीजनक शब्दामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. एवढचं नव्हे तर तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर मुनमुन दत्ताने एक पोस्ट शेअर करत माफी देखील मागितली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 2:49 pm

Web Title: taarak mehata ka ooltah chashmah babitaji aka munmun dutta share mud bath photo goes viral get trolled kpw 89
टॅग : Entertainment
Next Stories
1 सावळ्या रंगामुळे ‘या’ अभिनेत्रीला मिळत नव्हते चित्रपट; बॉलिवूडमध्ये बराच संघर्ष करावा लागला
2 प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? ‘भोंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
3 ‘त्याने मला फसवले’, लिएंडरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर महिमाने केला होता खुलासा
Just Now!
X