News Flash

सलमानसोबत काम करुनही ‘तारक मेहता’मधील अभिनेत्याला मिळाले नव्हते काम

या अभिनेत्याने 'मैने प्यार किया' या चित्रपटात काम केले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. पण सर्वात जास्त चर्चा या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या सुरु असतात. पण एक काळ असा होता की त्यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सोबत काम करुनही दीड ते दोन वर्षे चित्रपट किंवा मालिका मिळाली नव्हती.

दिलीप यांना लहान पणापासूनच अभिनयाची आवडत होती. ते शिक्षण घेत असताना देखील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचे. या कारणामुळे एकदा ते नापास देखील झाले होते. पण त्यावेळी वडिलांनी दिलीप यांच्या अभिनयाची आवड पाहता त्यांना पाठिंबा दिला होता. दिलीप अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. त्यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

१९८९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी रामू ही भूमिका साकारली होती. चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटात छोटी भूमिका साकारणाऱ्या रामू म्हणजे दिलीप यांना सलमान सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी राजू बडजात्या यांच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

त्यानंतर दिलीप यांनी अनेक छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. पण त्यांना वेगळी अशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी कभी ये कभी वो मालिकेत काम केले. पण क्या बात है मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यावेळी त्यांनी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले.

एफआयआर या मालिकेनंतर त्यांना काम मिळणे बंद झाले. २००६मध्ये जेव्हा तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मिळाली त्यापूर्वी जवळपास दीड वर्षे त्यांच्याकडे कोणतीही मालिका किंवा चित्रपट नव्हता. या मालिकेतील चंपकलाल या भूमिकेसाठी दिलीप यांची निवड करण्यात आली होती पण त्यांनी नकार दिला होता. त्यांनी जेठालाल हे पात्र साकारण्याचे ठरवले. तसेच चंपकलाल या भूमिकेसाठी त्यांचे मित्र अमित भट्ट यांचे नाव सुचवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 4:41 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah jethalal aka dilip joshi had no work even after working with salman avb 95
Next Stories
1 वृत्तवाहिन्यांविरोधात याचिका म्हणजे “टिचर टिचर, वो अर्णब मुझे..”
2 “सिद्धार्थ आणि निक्की दोघंच शो चालवतायेत का?”; माजी स्पर्धक ‘बिग बॉस’वर नाराज
3 सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मोदींना पाठवा हा मेसेज; सुशांतच्या बहिणीचं आवाहन
Just Now!
X