News Flash

गोकुलधाम सोसायटी प्रेक्षकांना हसवण्यासाठी झालीये सज्ज; ‘या’ दिवशी पहिला भाग होणार प्रदर्शित

'या' दिवशी 'तारक मेहता का उलटा चष्मा'चा पहिला भाग होणार प्रदर्शित

करोनाच्या प्रार्दुभावामुळे गेली तीन महिने सर्व काही ठप्प होतं. परंतु, आता हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यामुळे कलाविश्वातील चित्रीकरणालाही वेग आला आहे. आखून दिलेल्या नियमांचं पालन करत अनेक मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरु झालं आहे. यामध्येच सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा कार्यक्रमदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेची आतूरतेने वाट पाहत होते. मात्र अखेर या मालिकेचा नवा भाग कधी प्रदर्शित होणार हे सांगण्यात आलं आहे. मालिकेच्या मेकर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या नव्या भागाची तारीख जाहीर केली आहे.
येत्या २२ जुलै रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पुन्हा एकदा सुरु होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे असं दिसून येतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता या मालिकेच्या नव्या भागांची तारीख जाहीर झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 4:58 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah new episode 22 july telecast promo ssj 93
Next Stories
1 “सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीत होतोय ‘हा’ बदल”
2 संजय दत्त, सुनील शेट्टी मुंबईच्या डबेवाल्यांसाठी सरसावले; अस्लम शेख यांच्यासोबतीनं दिला मदतीचा हात
3 राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर चेतन भगत यांचा उपरोधिक टोला; म्हणाले…
Just Now!
X