News Flash

बॉक्स ऑफिसवरही ‘तान्हाजी’च हीरो

तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मांडण्यात दिग्दर्शक ओम राऊत यांना हिंदीतील पदार्पणात यश मिळाले आहे.

अजय देवगण

ऐतिहासिकपट म्हटलं की कथेतील सत्य अभ्यास-संशोधन आणि तर्काच्या आधारे वास्तवाला धक्का न लावता त्याची समतोल मांडणी करत प्रेक्षकांसमोर सादर करण्याचे मोठे आव्हान लेखक-दिग्दर्शकासमोर असते. ही सगळी गणिते व्यवस्थित सांभाळून तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मांडण्यात दिग्दर्शक ओम राऊत यांना हिंदीतील पदार्पणात यश मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करत असून कमाईचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत तब्बल ६१.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल, यात काही शंका नाही.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यांमध्ये चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ‘तान्हाजी’ने १५.१० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारी २०.५७ कोटी रुपये आणि रविवारी २६.०८ कोटी रुपये कमावले.

थ्रीडी तंत्रज्ञानात तयार झालेला हा ऐतिहासिकपट आणि जोडीला अजय देवगण, काजोल, सैफ अली खानसारखे हिंदीत ग्लॅमरस म्हणून यशस्वी ठरलेले मोठे चेहरे. या सगळ्यांचा समतोल साधत कुठेही हे चेहरे मराठेशाहीच्या इतिहासापेक्षा मोठे ठरणार नाहीत, इतक्या संयत पध्दतीने दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ची मांडणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 11:59 am

Web Title: tanhaji has a heroic weekend box office collection ssv 92
Next Stories
1 JNU प्रकरणी दीपिकाने पाठिंबा दिल्यामुळे जाहिरात कंपन्या बॅकफूटवर
2 ‘छपाक’नं सोडली उत्तराखंड सरकारवर छाप; मेघना गुलजार यांनी केलं निर्णयाचं स्वागत
3 …तर अमरीश पुरींऐवजी ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगॅम्बोची भूमिका
Just Now!
X