28 October 2020

News Flash

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

नुकताच अक्षयने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षयला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आता अक्षय कुमार खऱ्या लक्ष्मीसोबत छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावणार आहे.

सोनी वाहिनीवरील कपिल शर्मा सूत्रसंचालन करत असलेला ‘द कपिल शर्मा शो’ नेहमीच चर्चेत असतो. आता या चित्रपटातील बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि ट्रांसजेंडर अॅक्टिविस्ट लक्ष्मी शुक्ला हे कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहेत.

नुकताच अक्षय कुमारने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाची संपूर्ण टीम खऱ्याखुऱ्या लक्ष्मीसोबत आज कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे’ असे कॅप्शन अक्षयने दिले आहे. तसेच अक्षयने कियारा आणि लक्ष्मीसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. नुकताच चित्रपटातील नवे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 6:18 pm

Web Title: team laxmmibomb with the real laxmi on sets of kapil sharma show avb 95
Next Stories
1 ‘बॉलिवूड क्वीन’च्या घरी सनईचौघडे; शेअर केला भावाच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ
2 ‘घर असावं घरासारखं..’; ‘तारक मेहता’फेम अभिनेत्याने शेअर केल्या खास गोष्टी
3 ‘माझी बायको, माझी दुर्गा’; स्वप्नील जोशीने पत्नीप्रती व्यक्त केली कृतज्ञता
Just Now!
X