News Flash

कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीझर लाँच

या चित्रपटाच्या निमित्ताने कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही अनोखी जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

तारुण्य पुन्हा एकदा जगावे असे जवळपास सर्वांनाच वाटते. अशीच काहीशी रुपरेषा असणाऱ्या अनिरुध्द दाते नावाच्या म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा ‘लव्ह यु जिंदगी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ‘लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळणार आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना एक आगळावेगळा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही अनोखी जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

पिळगावकर साकारत असलेले चित्रपटातील मध्यवर्ती पात्र वाढत्या वयाचे सत्य स्विकारण्यास तयार नसून आपण आजही आधीचे तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते. म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे. आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस हेच दिग्दर्शक आणि निर्माते यांना या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगायचे आहे. एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बायगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली आहे. चित्रपटाची कथाही त्यांचीच असून हा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 8:11 pm

Web Title: teaser launch love you jindagi sachin pilgaonkar movie launch on 14th november
Next Stories
1 ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ची टीम पोहोचली असल्ल पाहुणे…च्या सेटवर
2 जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
3 राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाकेची ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ मराठी वेब सीरिज लवकरच
Just Now!
X