06 March 2021

News Flash

या तारखेला प्रदर्शित होणार ‘द स्काय इज पिंक’

'जय गंगाजल'नंतर प्रियांका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे

प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द स्काय इज पिंक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे.

‘द स्काय इज पिंक’ आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिनं लिहीलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित आहे. लहानपणापासूनच वकृत्वाचे कौशल्य मिळालेल्या आयशा चौधरीने तिच्या मृत्युपूर्वी ‘माय लिटिल एपिफेनिस’ हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या मुलीची कथा चित्रपटात पहायला मिळणार आहे. आयशाची भूमिका झायरा वसिम साकारत आहे. तर प्रियांका आणि फरहान अख्तर तिच्या पालकांची भूमिका साकारणार आहे.

प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’नंतर  प्रियांका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे तिला बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. ११ ऑक्टोबर २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:32 pm

Web Title: the sky is pink release date finalised to release
Next Stories
1 ‘सोनचिडिया’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
2 मुलीला पोलिओचा डोस देण्यास नकार, फवाद खानविरोधात एफआयआर दाखल
3 कपिल-सुनीलचा वाद मिटविण्यासाठी सलमानचा दुसऱ्यांदा प्रयत्न
Just Now!
X