01 March 2021

News Flash

‘तारक मेहता..’मध्ये लवकरच परतणार दयाबेन

गेल्या काही दिवसांपासून दिशा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या जोर धरत होत्या.

अभिनेत्री दिशा वकानी

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच मालिकेत परतणार आहे. दिशा ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये होती. मात्र प्रसूती रजेनंतर ती येत्या काही दिवसांत मालिकेत परतणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा पुढील दोन महिन्यांत ‘तारक मेहता..’मध्ये वापसी करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती काही महिने रजेवर होती. गेल्या काही दिवसांपासून दिशा तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या जोर धरत होत्या. तिची मुलगी फार लहान असून सध्या तिला मुलीसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, म्हणून ती मालिकेला कायमचे अलविदा करणार असल्याचे म्हटले जात होते. मालिकेचे निर्माते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते अशीही चर्चा होती. पण आता या चर्चा खोट्या ठरल्या असून दयाबेन लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे.

वाचा : इरफान खानसोबतच्या चित्रपटातून दीपिकाने घेतला काढता पाय?

गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने टॉप- १० मधील आपले स्थान कधीही हलू दिलेले नाही. दिशाने या मालिकेशिवाय ‘जोधा- अकबर’, ‘देवदास’, ‘लव स्टोरी २०५०’ आणि ‘मंगल पांडे- द रायझिंग’ सिनेमात काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 2:13 pm

Web Title: this is when disha vakani aka daya ben will return to taarak mehta ka ooltah chashmah
Next Stories
1 इरफान खानसोबतच्या चित्रपटातून दीपिकाने घेतला काढता पाय?
2 ‘सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये मला हीन वागणूक मिळाली’
3 सोनाली बेंद्रेच्या मृत्यूच्या अफवांवर तिचा पती म्हणाला…
Just Now!
X