21 September 2020

News Flash

कवी कुमार आझाद म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व -वरुन धवन

इतकंच नाही तर त्यांच्या निधनाचे पडसाद मोठ्या पडद्यावरही पडल्याचं दिसून आलं.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील डॉ.हाथी अर्थात कवी कुमार आझाद यांनी ९जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाचे पडसाद त्यांच्या चाहत्या वर्गात आणि छोट्या पडद्यावर पडल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर त्यांच्या निधनाचे पडसाद मोठ्या पडद्यावरही पडल्याचं दिसून आलं. अभिनेता वरुन धवनने कवी कुमार आझाद यांच्या निधनावर शोक व्यक्त करुन त्यांच्या आठवणींना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.

कवी कुमार आझाद यांच्या निधनाचं वृत्त वरुनपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला प्रचंड धक्का बसला होता. त्यानंतर तात्काळ त्याने इन्स्टाग्रामवर कवी कुमार आझाद यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत त्यांच्याबद्दल दोन ओळींमध्ये भाव व्यक्त केले.

एका चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी वरुनने तारक मेहताच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्याची ओळख कवी कुमार आझादांबरोबर झाली होती. त्यामुळेच त्याने ‘कवी कुमार आझाद हे दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली’, असं कॅप्शन देत कवी कुमारांच्या आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान, कवी कुमारांच्या निधनामुळे छोट्या पडद्यावर मोठी पोकळी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. कवी कुमारांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावरही काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 12:44 pm

Web Title: varun dhawan shocked by kavi kumar azads death
Next Stories
1 २० वर्षांनंतर सलमान रंभा आले एकत्र, फोटो व्हायरल
2 अजय देवगण साकारणार चाणक्य
3 Video..जान्हवीने असा घेतला पावसात भिजण्याचा आनंद
Just Now!
X